Admission at a Glance:

Courses offered by Indian Universities

Yashwantrao Chavan Maharashtra Open University
Discipline Skill Development
Program Level Certificate
Qualification Certificate
Total Seats 28
Program Duration(in Months) 12
Classroom Hours Nil
Examination/Course Pattern Yearly
Program Description घरकाम कौशल्य विकास प्रमाणपत्र शिक्षणक्रम घरकाम हे अत्यंत महत्वाचे पण तेवढेच दुर्लक्षित क्षेत्र आहे. घरकामगार, मोलकरीण, घागडी किंवा घरेलू कामगार, गृहकाम सहाय्यिका, गृहकामगार अथवा मावशी,मामी,आत्या,काकी,नावांनी आपण ज्यांना संबोधतो. त्या शब्दापेक्षा त्यांच्या वेदना, व्यथा, अज्ञान, अंधश्रद्धा इ.बद्दल आदर, आस्था व आपलेपणाची भावना निर्माण होण्यासाठी घरकामगार कौशल्ये विकास शिक्षांक्रमाची रचना मुक्त विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विद्याशाखेच्या माध्यमातून केली आहे. यासाठी विदर्भ मोलकरीण संघटना नागपूरच्या डॉ.रूपाताई कुलकर्णी बोधी, नाशिक मोलकरीण संघटनेचे प्रा.राजू देसले, औरंगाबाद चे साथी सुभाष लोमटे, नाशिकच्या श्रीमती सुजाता बाबर, श्रीमती रोहिणी नायडू, प्रा. चंद्रप्रभा निकम, advokate.मिलिंद बाबर, आणि हिंगोलीचे प्राचार्य विजय कांबळे ह्या सर्वांच्या सहयोगणी समन्वयक प्रा.विजयकुमार पाईकराव ह्यांनी शिक्षणक्रमाचे शास्त्रीय व शैक्षणिक प्रारूप तयार केले आहे. या मध्ये घरकामगार कौशल्ये विकासासाठी भाषा विकासासाठी आणि घरकामगाराचे आरोग्य व पोषणआहार बरोबरच दैनंदिन सामान्य ज्ञानाचा आधारित अशा स्वतंत्र सात स्वयंपुर्णागात (मॉडूल) विकसन केले आहे. या सातही पाठ्यपुस्तकांची रचना अध्ययन सुलभ आहे. तसेच मुद्रित पुस्तका बरोबरच e-book व online fliphtml संकेत स्थळावर देखील उपलब्ध आहेत. या शास्त्रीय ज्ञानाच्या सहाय्यानी ज्ञानात्मक समाज निर्मितीची प्रक्रिया खऱ्या अर्थानी ज्ञानगंगा घरोघरी, याशवानी कानोकानी स्वरुपात प्रवाहित होणार आहे. या शिक्षणक्रमाच्या अभ्यासानंतर घरकामगरांमध्ये पुढील चौदा कलमी बाबींचा सकारात्मक विकास होईल असा विश्वास आहे. १) आर्थिक,२) मानवीय३) सांस्कृतिक ,४) अंधश्रध्दा निर्मुलन५) आत्मविश्वास६) पुर्वाग्रहण७) संघटितपणा८) हृदयपरिवर्तन९) सहानुभूती१०) शरीरश्रम११)प्रतिष्ठा१२) कुपोषण१३) आरोग्य१४) शिक्षण विशेष म्हणजे घरमालकीण व घरकामगार ह्यांच्या दृष्टीत, वृत्तीत आणि प्रवृत्तीत सुद्धा या शिक्षणक्रमाच्या यशस्वी अभ्यासानंतर सकारात्मक बदल होणार हे मात्र नक्की. मुक्त व दूर शिक्षणानी सुज्ञ करावे सकलजन आपल्या उणीवा कळण्यासाठी, प्रवास, संवाद व वाचन महत्वाचे त्यामुळे या घरकामगार कौशल्ये विकास शिक्षक्रमाची वाचनीय व संग्रहणीय आहेत. अभ्यासक्रम (उपलब्ध विषय) EDU 061: 1) घरकामगारासाठी भाषा संवाद कौशल्ये : मराठी Language communication skill for domestic workers : Marathi घटक १ घरकामांसाठी साक्षरता २ ओळख मराठी भाषेची ३ घरकामगारांसाठी अंक ओळख आणि आर्थिक साक्षरता ४ घरकामगारांच्या संवादाचे स्वरूप ५ घरकामगारांसाठी सामानीज्ञान २) घरकामगारांसाठी भाषा संवाद कौशल्य :हिंदी EDU 061 2) घरकामगारासाठी भाषा संवाद कौशल्ये : हिंदी Language communication skill for domestic workers: Hindi घटक १ विषय प्रवेश २ अक्षरज्ञान शब्दपरिचय एंव बोलचाल ३ रोज रोज कि बोलीभाषा कि के शब्द ४ साधारण व्याकरण ५ साधारण हिसाब-किताब ६ समय, दिन, पखावाडे, तीथियां, महिने, तथा राष्ट्रीय-आंतराराष्ट्रीय दिवस EDU 061 3) घरकामगारासाठी भाषा संवाद कौशल्ये : इंग्रजी Language communication skill for domestic workers: English UNIT १ संभाषण पूर्ण तयारी २ संभाषण EDU 062-घरकामगारांसाठी पोषाहार Healthy food for domestic workers १ खानपान आणि आरोग्य २ पाचनेंद्रिया विषयी काळजी ३ अगदी सहज, सोप्या स्वस्त पाककृती EDU 063-घरकामगारांसाठी आरोग्यशास्त्र Health science for domestic workers घटक : १ मानवी शरीराची रचना व कार्य २ सामान्य संसर्गजन्य संक्रमण रोग ३ प्रथमोपचार ४ वयक्तिक आरोग्य ५ भोबतालाची पर्यावरणाची स्वच्छता ६ अपंगत्व-विकलांगता ७ अनुवांशिक रोगाची ओळख ८ सिकल सेल रोग ९ नको असलेली गर्भधारणा टाळणे १० गरोदरपणात घ्यावयाची काळजी ११ पौगंडावस्था १०-१९ वर्ष EDU 064-घरकामगार कौशल्ये विकास Skill Development for domestic workers घटक १ घर कामगारांसाठी व्यावसायिक प्रशिक्षणाची गरज, संकल्पना स्पष्टता व महत्व २ गृह्स्वछता व्यवस्था यांचे महत्व कौशल्ये ३ स्वयंपाक घरात काम करणाऱ्यांसाठी लागणारी कौशल्ये ४ खादये व पेय सेवा (सर्विस) कौशल्ये ५ लहान मुलांची, वृद्धाची काळजी व देखभाल करण्याचे कौशल्ये ६ घरकामगारांसाठी संवाद कौशल्ये ७ बागकाम देखरेख व्यवस्था व व्यावस्थापन कौशल्ये
Admission & entry requirements साक्षर कामगार स्त्री/पुरुष किंवा कोणतेही दहावी पास/नापास स्त्री/पुरुष
>